जेठभावड़ा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांचा सर्वांगीण विकास होणार: आमदार सहषराम कोरोटे

जेठभावड़ा येथे वयक्तिक आणी सार्वजनिक विकास कार्याचा दहा वर्षीय सुक्ष्मनियोजन कार्यक्रम

देवरी २६: शासनाची संकल्पना आहे की, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक व समाजातील प्रत्येक कुटुंबा पर्यंत विकास आणि योजनेचे लाभ मिळावे. या करिता प्रयन्त करुण या क्षेत्राचे सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबध्य आहे.प्राथमिक स्वरुपात जेठभावड़ा ग्रामपंचायत अंतर्गत सर्व व्यैक्तीक व सार्वजनिक क्षेत्राचा विकास व्हावा . या करिता सर्व संबधीत विभाग आणि शासकीय यंत्रने द्वारे संयुक्त रुपात सूक्षम नियोजन करून या क्षेत्रात सर्व कामे सुरु होणार आहे. ही प्रकिया सतत तीन दिवसापर्यंत सुरु राहणार आहे.या प्रकियेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यैक्ति पर्यंतच्या सर्व सर्वेक्षण करुण या कार्याची सुरुवात केली जाणार असून यात अभूतपूर्व परिवर्तन पहावयास मिळणार आहे.त्यामुळे जेठभावड़ा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांचा सर्वागीण विकास होणार आहे असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील जेठभावडा ग्रा.पं .येथे सोमवारी (ता.२५एप्रिल ) रोजी आयोजीत सुक्ष्म नियोजन कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहषराम कोरोटे,भर्रेगांव क्षेत्राचे जी.प सदस्य संदीप भाटीया ,पं. स सदस्य अंबिका बंजार ,प्रल्हाद सलामे ,जिल्हा कांग्रेस चे महासचीव बळीराम कोटवार ,जेठभावडा चे सरपंच श्री दुधनांग ,उपसरपंच शालिनीताई देशाई ,तटांमुक्ति समिति अध्यक्ष युवराज प्रधान ,माज़ी सरपंच डॉ. जितेन्द्र राहांगडाले , पोलीस पाटील ,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गौतम साखरे यांच्यासह कृषी विभाग ,वनविभाग व अन्य शासकीय यंत्रनेचे सर्व अधिकारी ,कर्मचारी व गावकरी बहुसंखेने उपस्तिथित होते.

Print Friendly, PDF & Email
Share