जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
गोंदिया,दि.25 : जागतिक हिवताप दिनानिमित्ताने जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत 25 एप्रिल रोजी परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी व शहरी विभागातील आशा यांची स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हिवताप जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र गोंदिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रुचा कोतवाल तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील बी.जे.राऊत, डी.पी.कुमरे, एन.टी.पराते, के.एन.डोंगरे, आर.एस.कुंभलकर, ए.डी.बले, आर.एम.बिसेन, आर.वाय.जायभाये, शितलकुमार दोनोडे, पी.सी.गजभिये उपस्थित होते. सदर रॅली केटीएस सामान्य रुग्णालय येथून गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे केटीएसला परत आली. सदर रॅलीमध्ये ‘कोरडा दिवस पाळा हिवताप टाळा’, ‘माझापासून सुरुवात करु हिवतापाला शुन्य करु’, ‘येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची’ इत्यादी घोषवाक्य वापरुन जनजागृती करण्यात आली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.