देवरी: लोहारा गावात घरकूल योजनेमध्ये घोळ, शासकीय कर्मचाऱ्यांचे घरकुल यादीत नावे
देवरी/लोहारा 24 : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास , रमाई आवास योजने अंतर्गत ज्यांचे कडे परिपूर्ण पक्के घर नसून राहायला मोडके तोडके घर आहे अशा लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकुल योजना देण्यात येते परंतु ग्रापं लोहारा, पंस देवरी, जिप गोंदिया येथील प्रकाशित झालेल्या घरकुल यादीमध्ये ज्यांच्या कडे पक्के घर आहेत, शासकीय नोकरी आहे व सेवानिवृत्त कर्मचारी आहेत अशा लोकांचे नाव घरकुल यादीमध्ये आल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रा.प. लोहारा येथे घरकुल यादी बघण्यास गेले असता अनुक्रमांक 06, 18, वर शासकीय कर्मचारी असून क्रमांक 34 अविवाहीत असून शासकीय नोकरीवर आहेत सदर प्रकरणाची माहीती सरपंचाला विचारली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. हरीश उके , उमेश कावळे , चिराग उके , अनिल टेम्भूरकर यांनी आरोप केला असून लोहारा गावातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
सदरची तक्रार मला प्राप्त झाली असून माहिती पंचायत समितीला दिली आहे. पंचायत समिती देवरी मार्फत यादीची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
राजू मेश्राम , ग्रामसेवक, ग्राम पंचायत लोहारा