सुपर कॉम्पुटर चे जनक पद्मभूषण डॉ. विजय भाटकर यांच्या हस्ते श्री फ्यूचरिस्टिक टेक्नॉलॉजीसच्या ऑलिटो या पेटंटेड स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईटचे पुण्यात उद्घाटन

पुणे : खनिज इंधनाचा साठा कमी होत आहे. कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन आणि त्याचे प्रतिकूल परिणाम म्हणून वीज निर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणून सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. भारत सरकारने नजीकच्या भविष्यात अनेक सौर ऊर्जा प्रकल्पांची योजना आखली आहे. श्री फ्यूचरिस्टिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ऑलिटो ब्रँड अंतर्गत अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह पेटंटड स्मार्ट सोलर स्ट्रीट लाइट प्रणाली विकसित केली आहे. या आधुनिक सौर पथ दिव्याचे व्यावसायिक नाव OLITO ठेवण्यात आले आहे. OLIT-O, पहिला 0 म्हनजे शून्य ऊर्जेचा वापर, मधला LIT म्हणजे प्रकाश आणि शेवटचा o म्हणजे शून्य कार्बन पदचिन्हे एका दिवसात दहा पेटंट दाखल करण्याचा विश्व विक्रम करणारे शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर हे गेल्या सात वर्षापासून या तंत्रज्ञानावर संशोधन करीत होते आणि त्यांनी सूर्याचा मागोवा घेऊन 40 टक्के अधिक सौर ऊर्जा गोळा करण्यास सक्षम असलेली स्मार्ट स्ट्रीट लाइट प्रणाली शोधून काढली.
18 एप्रिल रोजी पुण्यात सुपर कॉम्पुटर चे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भाटकर यांच्या हस्ते ऑलिटो बँड नावाखाली भारतातील पहिल्या स्मार्ट सोलर स्ट्रीट लाइट सिस्टमचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभात मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालिका व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. मुक्ता पुणतांबेकर, तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (M.E.D.A) चे वरिष्ठ अधिकारी श्री. जयेंद्र वाढोणकर उपस्थित होते. डॉ विजय भाटकर यांनी स्वतः या आधुनिक सौर पथ दिव्यास मोबाईल ने सुरु आणि बंद करून त्याच्या आधुनिकते ची जणू खात्रीच करून घेतली. ऑलिटोच्या माहितीपत्रकाचे अनावरण देखील उपस्तित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ विजय भाटकर म्हणाले कि त्यांना सुद्धा नवनवीन तंत्राद्यानाचा वापर कारणांत फार रस होता, त्यांनी सुरवातीच्या काळात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी एक कॉम्पुटर प्रोग्रॅम आणि चिप ची निर्मिती केली होती. OLITO टीम चे कार्य पाहून त्यांना त्यांच्या तारुण्यातील दिवस आठवले. ते म्हणाले परदेश्याच्या तुलनेत आपल्या देशात टॅलेंट ची कमतरता नाही पण एक टीम म्हणून कार्य करण्याची आवश्यकता आहे. वस्तू तयार करण्यापासून ती शेवटच्या ग्राहकापर्यंत •पोहचवण्यासाठी टीम ची गरज असते. जर टीम नसती तर भारताचा पहिला सुपर कॉम्पुटर निर्माणच झाला नसता. जशी कॉम्पुटर एक क्रांती होती तशीच सौर ऊर्जा एक क्रांती आहे आणि OLITO हा त्या क्रांतीतून जन्मास आलेला सर्वोत्तम उत्पादन आहे. त्यांनी श्री फ्यूचरिस्टिक टेक्नॉलॉजीस या कंपनीस उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आपले संबोधन संपविले.
हे आधुनिक सौर पथ दिवे (सोलर स्ट्रीट लाईट) सूर्याचा मागोवा घेतात त्यामुळे पावसाळ्यात कमी काळ सूर्य प्रकाश आणि अप्रत्यक्ष सौर विकिरण असताना सुद्धा कार्य करतात. सौर पैनल है दररोज १८० अंश फिरतात. त्यामुळे पॅनेलवर धूळ किंवा ●पाला पाचोळा एकत्रित होत नाही आणि सोलर पॅनलची कार्य क्षमता कमी होत नाही तसेच सौर पॅनलला वारंवार स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. OLITO रात्री आपोआप सुरु किंवा दिवसा बंद होतो, सौर दिव्याला पासवर्डद्वारे संरक्षण देता येते आणि भ्रमणभाष (मोबाईल) चा वापर करून वायफाय (Wi-Fi) च्या मदतीने १०० मीटर अंतराहून सुद्धा हे अत्याधुनिक सौर दिवे चालू बंद करता येतात. आता लवकरच OLITO या पेटंटड स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट चा उपयोग सामान्य जनताही करू शकेल.
श्री फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीजचे सी.ई.ओ श्री. अनुशील मेंढे यांनी या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले की नवीन पिढीला सौरऊर्जेचे महत्त्व पटवून देणे आणि दर सहा महिन्यांनी ऑलिटो ब्रँडची अद्ययावत उत्पादने तयार करणे हे त्यांचे ध्येय आहे. ओलिटोचे विपणन आणि विक्री पुण्यातील प्रशिध्द कंपनी एस.आर. टेक्नोवर्ड द्वारे केले जाणार आहे. अधिक माहिती करिता संपर्क करा: श्री फ्यूचरिस्टिक टेक्नॉलॉजीस, पुणे ९१६८६०१११० / ९१५८६०१११० | ईमेल : [email protected], [email protected], [email protected]) इथे संपर्क साधावा.

Share