तेंदूपत्ता संकलनाच्या हेतुने आग लावणाऱ्याला केले न्यायालयात हजर

भंडारा 09: वन प्रकल्प विभाग भंडारा अंतर्गत वनपरिक्षेत्र चंद्रपूर सोनेगाव अधीनस्थ चिचगाव परिमंडळातील चिचगाव बिटातील कक्ष क्रमांक 184 बांबू रोपवनात तेंदूपाने संकलनाच्या हेतुने आग लावणारा आरोपी अशोक सोंविदा राखडे रा. किन्ही .तालुका साकोली याला मौक्यावर पकडून वन गुन्हा जारी करण्यात आला. त्याला दिनांक 8/4/2022 ला न्यायालयात हजर करण्यात आले.. सदरची कारवाई मा.नितीनकुमार सिंह भा. व. से. विभागीय व्यवस्थापक, वन प्रकल्प विभाग भंडारा. मा. सहाय्यक व्यवस्थापक, वन प्रकल्प विभाग भंडारा. यांच्या मार्गदर्शनात श्री. आर. पी. साबळे, वनपरिक्षेत्राधिकारी. श्री जे. एच. वंजारी, क्षेत्रसहाय्यक, चिचगाव. श्री. एस. एस. वाहने, वनरक्षक चिचगाव . श्री. एस. एम. होने, वनपरिक्षेत्र अधिकारी, सि. एच. मोहरकर, क्षेत्र सहाय्यक,श्री. डोये वनरक्षक श्री. गवळी वनरक्षक व इतर वनकर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली..

Share