धुकेश्वरी मंदिर परिसराचे सौंदर्यकरण व आवार भिंत बांधकामाचे भूमिपूजन

■ आमदार कोरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर एकूण ३० लाख निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन

देवरी, ता.१२: आमदार सहषराम कोरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेले येथील माँ. धुकेश्वरी मंदिर परिसराच्या सौंदर्यकरणासाठी १५ लाख रुपयांची आणि आवारभिंत बांधकामासाठी १५ लाख असे एकूण ३० लाख रुपयांच्या मंजूर निधीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीराम नवमीच्या दिनाचे औचित्यसाधून रविवार(ता.१० एप्रिल) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या दोन्ही विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी माँ धुकेश्वरी मंदीर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष अँड. प्रशांत संगीडवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष सी.के.बिसेन, ट्रस्ट समितीचे भैय्यालाल चांदेवार, भास्कर धरमशहारे, सुशील शेंद्रे, आनंदराव नळपते, पवन कुमार कटकवार, अँड. पुष्पकुमार गंगबोइर, डॉ. जितेंद्र रहांगडाले यांच्या सह माँ धुकेश्वरी मंदिरात उपस्थित देवरी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतो.

Share