गडेगाव हनुमान तलावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचन क्रांती येणार
गडेगाव येथील ल.पा. हनुमान तलावाची पाहणी
प्रतिनिधी /देवरी, ता.११: देवरी तालुक्यातील गडेगाव येथील लघु पाट बंधारे हनुमान तलावाची गेट व कालव्याची दुरुस्ती मागील अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या तलावाच्या पाण्यातून फक्त ५० एकर शेतीलाच सिंचन केले जाते. परंतु या भागातील शेतकऱ्यांच्या या समस्येला घेऊन मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून या तलावाची पाहणी केली. सोबतच या तलावाच्या गेट व कालव्याचे सर्वे करण्यात लावले. हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर लगेच दहा दिवसांत एम.आर.ई.मी.एस.च्या माध्यमातून या तलावाची गेट व कालव्याची दुरुस्तीचे काम चांगल्या प्रकारे करण्याचे सूचनाही सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना दिले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर या हनुमान तलावाच्या पाण्यातून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुढच्या रब्बी पिकासाठी जवळपास १५० एकर शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे या तलावाच्या पाण्यातून गडेगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचन क्रांती येणार असल्याचे प्रतिपादन सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील गडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे हनुमान तलावाची शनीवार (ता.९ एप्रील ) रोजी पाहणी दरम्यान उपस्थित शेतकरी व गावकरी यांना संबोधित करतांनी बोलत होते.
या प्रसंगी जागेचे सर्वे करण्यासाठी आमगावचे उपविभागीय अभियंता वासुदेव रामटेके, कनिष्ठ अभियंता श्री. बिसेन यांच्या सह माजी पं.स.सदस्य ओमराज बहेकार, छगन मुंगणकर, प्रभा अरकरा, ताराचंद कोरोटे, खेमराज बोगारे, महागु मडावी, भीमराव वालदे, ईश्वर अरकरा आणि गडेगाव परिसरातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक महिला, पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.