शेतकरी अपघाती विम्यासाठी 7.28 कोटीची निधी मंजूर

गोंदिया: शेती करताना होणार्‍या अपघातामुळे शेतकर्‍याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकारावं लागत. अश्या कालावधीत शेतकर्‍याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सन 2005-6 मध्ये कार्यान्वित केली. मात्र डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 या खंडित कालावधीमध्ये ज्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती, परंतु विमा निधी मिळाला नव्हता अशा जिल्ह्यातील 20 प्रस्तावांना निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने 31 मार्चच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मित्रान करण्यास मंजुरी दिली आहे.

शेती करताना शेतकर्‍यावर नानाविध संकटे कोसळतात. त्याची करणे वेगवेगळी असू शकतात. जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकर्‍याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने ही योजना 2005-06 सुरु केली. तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते. ते बदलून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. 2009-10 मध्ये या योजनेसाठी 1 लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता.

परंतु या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता तत्कालीन भाजप सरकारने सन 2015-16 मध्ये ही रक्कम वाढवून 2 लाख एवढी केली. जर शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव 2 लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जातो. जर शेतकर्‍याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला 2 लाख एवढा विमा देण्यात येतो. जर शेतकर्‍याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकर्‍याच्या कुटुंबाला 2 लाख एवढी रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाते. जर अपघातामध्ये शेतकर्‍याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला 1 लाख विमा दिला जातो. मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या प्रस्तावांना हे प्रशासकीय कारणास्तव निधी मिळू शकला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या 31 मार्चच्या बैठकीत 7 कोटी 28 लाख रुपयाच्या निधी वितरणास मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील 42 प्रस्तावांपैकी 22 प्रस्तावांना निधी वितरण करण्यात आला होता उर्वरित प्रस्तावांचा निधी खंडित होता. रखडून असलेल्या 20 प्रस्तावांच्या लाभार्थी कुटुंबांना लवकरच निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सन 2021-22 या वर्षात शेतकरी विमा अपघाताची 68 प्रकरणे प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share