पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
सडक अर्जुनी : विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतुन नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याचे उदेशाने व नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या करीता पोलीस विभाग व एस.आय.एस. यांचे संयुक्त विद्यमाने संरक्षण गार्ड पदासाठी दि.02 एप्रिल रोजी आय.टी.आय.सडक/अर्जुनी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्यात अंदाजे 400 ते 450 युवक हजर झाले होते. त्यांची शारीरीक, लेखी चाचणी होवुन त्यापैकी 53 उमेदवार यांची संरक्षण गार्ड पदासाठी निवड करण्यात आली असुन त्यांना दि. 09/05/2022 रोजी आरा, जशपुर (छत्तीसगड) येथे प्रशिक्षणाकरीता बोलावण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळावा विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया , अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, पोना संतोष राऊत, सचिन गेडाम, पोलीस शिपाई मंगेश डोंगरवार नक्षलसेल गोंदियाचे पोलीस हवालदार मार्टीन, ज्योती मरकाम, रेखा धुर्वे, शेखर गणवीर, पोलीस शिपाई आशिष वंजारी व एस.आय.एस. कपंनीचे कर्मचारी हजर हाते.