चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना परत करून दिली गुढी पाडव्याची भेट

गोंदिया : 02 : 1 मार्च रोजी पहाटे अर्जुनी मोर येथील साई सर्वेश्वर बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी करून सुमारे 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच दिनांक 09 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादी मुनेश्वर नामदेव लुटे प्रतापगड हे अर्जुनी ते प्रतापगड मार्गाने मोटरसायकल वरून खैरी जंगल शिवारातील रस्त्याने जात असताना दोन अनोळखी चोरट्यांनी मोटरसायकल वरून फिर्यादीचा रस्ता आडवला फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांना गाडीवरून खाली उतरले व लाथा बुक्क्यांनी खूप मारहाण केली तसेच जंगलातील एका झाडाला बांधून ठेवले तसेच फिर्यादीच्या खिशातील पाकीट काढून घेऊन पळून गेले. त्या पाकिटामध्ये 4500 रुपये व इतर महत्वाची कागदपत्रे होती. अर्जुनी मोर पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन्ही गुन्ह्यांचा तपास करून गुन्हा करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली होती व त्यांनी चोरून नेला मुद्देमाल देखील हस्तगत केलेला होता.

मा. न्यायालयाने या दोन्ही गुन्हयातील पोलिसांनी हस्तगत कैलेला सर्व मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचा आदेश केल्याने आज रोजी गुडीपाडव्याचे निमीत्त साई सर्वेश्वर बारचे मालक राजाराम मारुती फुलेवार यांना त्यांचे 99000 रुपये व इतर साहित्य तसेच प्रतापगडचे मुनेश्वर नामदेव लुटे यांना 4500 रुपये व इतर साहित्य उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले अर्जुनी मोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधिक्षक गोंदिया विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, संभाजी तागड तसेच पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम यांनी केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share