राज्यभर ‘निर्बंधमुक्त’ गुढी पाडव्याचा उत्साह; देवरीत दोन वर्षांनंतर शोभायात्रेची धूम

डॉ. सुजित टेटे@प्रहार टाईम्स

देवरी 02: चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. या दिवशी सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.

गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. यामुळे यंदाचा गुढीपाडवा मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा होताना दिसत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज देवनगरीत गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोटार सायकल मिरवणूक काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

Share