चांदलमेटा शाळेचे मुख्याध्यापक तरुण वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा
प्रहार टाईम्स
देवरी 01: पंचायत समिति अंतर्गत येणार्या डोंगरगाव केंद्रातील जि.प.शाळा चांदलमेटा या शाळेचे कार्यक्षम मुख्याध्यापक श्री तरुण कुमार बकाराम वाघमारे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवानिवृत्तीनिरोप तथा सत्कार सोहळा चांदलमेटा येथे केंद्र –डोंगरगाव व गावकर्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास अध्यक्षस्थानी मा.महेंद्रजी मोटघरे शिक्षणाधिकारी(प्राथ.)जि.प.गोंदिया,हे होते. प्रमुख पाहुणे-प.स.देवरी सदस्या वैशालीताई पंधरे,श्री.हिरामनजी टेकाम सरपंच ग्रामपंचायत ओवारा,बोपचे साहेब विस्तार अधिकारी, श्री.सुरेन्द्र जगणे केन्द्र्प्रमुख डोंगरगाव,ए.आर.शेंडे सर माजी केन्द्र्प्रमुख,एम.एच.परसगडे सर दिघोरी,एस.आर.रहांगडाले सर सलंगटोला, एच.एन.तूरकर सर लेंडेझरी,श्री.राजकुमार परतेती शा.व्य.समिति अध्यक्ष, सौ.चित्ररेखा वल्के उपाध्यक्षा,श्याम जामरे सर,आदी होते.मा. अध्यक्षांच्याहस्ते सत्कारामुर्ती श्री वाघमारे सर यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला तदनंतर केंद्र डोंगरगाव शिक्षकांतर्फे व गावकर्यांकडून सत्कार करण्यात आला.अध्यक्ष स्थांनावरून बोलताना सेवानिवृत्तींनंतर कशाप्रकारे आयुष्य आनंदी घालवावे याविषयी शिक्षणाधिकारी साहेब यांनी मार्गदर्शन केले व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.श्री रहांगडाले सरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,काहींनी त्यांचा सोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला सौ.वैशालीताई पंधरे यांनी शाळेसाठी वाघमारे सर यांचे कष्ट व प्रयत्न कसे होते त्याची माहिती दिली.जगणे सर केंद्रप्रमुख डोंगरगाव यांनी त्यांनी केलेल्या शालेय प्रगतीबद्दल बोलून दाखवले. दीपक कापसे मुख्याध्यापक सावली, वाघमारे सर मुख्याध्यापक हर्दोली, मेंढे सर उच्च श्रेणीमुख्याध्यापक डोंगरगाव, यांनी पुढील वाटचाल व सुख-समृद्धीचे जावो अशी कामना केली,कार्यक्रमास केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक,चांदलमेटा गावातील ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रणित कराडे सर शाळा –ओवारा यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.भागवत भोयर मुख्याध्यापक,शाळा ओवारा यांनी केले.