टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या पुढाकाराने मदतीचे हात सरसावले, टेकाम कुटुंबियांना मिळाली मदत

◾️अप्पर जिल्हाधीकारी राजेश खवले यांच्याशी प्रहारटाईम्स चे संपादक डॉ सुजित टेटे यांनी जाणून घेतली माहिती

गोंदिया 01: जिल्हात मुलीच्या लग्नापूर्वीच घर जळून झाले खाक झाले , लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची झाली राख रांगोळी झाली. वडिलांसमोर मुलीच्या लग्नाचे मोठे संकट उभे राहिले यासंदर्भात टीव्ही 9 वृत्त वाहिनीने बातमी दाखविली आली. त्यांच्या मदतीला धावून आले गोंदिया जिल्हाचे उप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले. अर्जुनी मोरगांव तालुक्यातिल गोठनगाव येथील टेकाम कुटुंब मनोहर टेकाम यांच्या मुलीचे एप्रिल महिन्याच्या 25 तारखेला लग्न ठरले लग्न म्हणजे की बापासाठी एक जनु उत्सत्व म्हणून आपली मोलमजूरी करून जमवीलेली कमाई आपली मुलगी मनीषा हिच्या लग्नासाठी खर्च करून टाकली. लग्नाला लागणारे कपड़े ,अन्नधान्य, दागींने सर्व खरेदी करून त्यांनी जमा करून ठेवले. आता घर सुंदर दिवसा म्हणून त्यांनी घराला रंगरंगोटी करणासाठी त्यांनी सर्व सामान घराच्या समोरच्या झपरीत आणून ठेवले टेकाम कुटुंब रात्रि झोपी गेले. मात्र काळाच्या मनात अजुन काही दूसरे शिजत होत. रात्रि अचानक आरडाओरड सुरु झाली टेकाम कुटुंब उठून बाहेर येतो तर क़ाय घराला आग लागली. पाहाता पाहता आगिने रौद्र रूप घेतले. लग्नासाठी खरेदी केलेले एक एक सामान भक्ष करत असतांना बापाचा काळजा ठोका चुकत होता. लोकांना मदतीने आग विझली खरी; मात्र लग्नासाठी खरेदी केलेल्या समानाची राख रंगोळी झाली. आता वडील मनोहर यांना मुलीचे येणारे लग्न कसे करावे, घर कसे उभे करावे हा प्रश्न भेडसावत असून पुढील सुखी जीवनाच्या स्वप्नात असलेल्या मुलगी मनीषा हिचा चींतेत पडलेला चेहरा पाहुन वडिलांचा चिंतेत भर पाडत आहे. त्यांमुळे काही खाऊन जीव देऊन टाकवा अशी इच्छा वडील मनोहर यांनी आपली पत्नी दुर्गा यांना बोलावून दाखविली आहे. तर आपल्या वडिलांची स्थिति बघून न होत असल्याने मदतीची आर्त हाक ही भावीवधू मनीषा करू लागली आहे.

वृत्त वाहिनी आणि माध्यमांनी सदर बातमी प्रकाशित करताच मदतीचा हात सुरु झाला आता गोठनगाव च्या मुलीचे लग्न सुरळीत पार पळणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हाचे उप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य जनतेने ह्या बातमी ची दखल घेत त्यांना मदत पोहचती केली आहे. यात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पासुन तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पैशाची व भांडयाची मदत केलि असून प्रकल्प अधिकारी कार्यालयातुन गहू,तांदूळ व इतर धान्य उपलब्ध करून दिले आहे. ह्याशिवाय प्रणय अजहर ह्यांच्या क्लॉथ सेंटर कडून भावी वधुला लाचा,व कुंटूँबाला कपडयाची मदत केली आहे. देवरी चे रितेश अग्रवाल यांनी 5000/- सुद्धा मदतीच्या हाथ पुढे केला ह्या सर्व मदतीने टेकाम कुटुंब गहिवरले असून त्यांनी मदतकर्त्याचे आभार मानले आहे.

Share