काँग्रेस पक्ष हाच सर्वसामान्य गरीब लोकांची काळजी घेणारा पक्ष आहे: आमदार सहषराम कोरोटे
■ देवरी येथे काँग्रेस पक्षाकडून वाढत्या महागाई विरोधी आंदोलन
देवरी ०१ : आपल्या देशात सतत वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य व गरिबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व अन्य जीवनावश्यक वस्तूचे भाव प्रत्येक दिवसी वाढत असून केन्द्रातील मोदी सरकार गरिबांचे महागाईचे प्रश्न सोडविण्यात जरासेही चिंतीत दिसत नाहीत. तसेच देशातील लहान-लहान उद्योग आणि अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मिळणारे आरक्षण व नौकऱ्या संपविण्याच्या तैयारीत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस हा पक्ष नसून एक विचारधारा आहे. काँग्रेसचे हे महागाई विरुद्ध आंदोलन सत्ता प्राप्तीसाठी नसून फक्त गरीब, बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर लोकांसाठीच आहे. कारण काँग्रेस पक्ष हाच सर्व सामान्य गरीब लोकांची काळजी घेणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी येथील गोंडवीरांगणा महाराणी दुर्गावती चौकात तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने गुरुवार(ता.३० मार्च) रोजी आयोजित देशातील वाढत्या महागाई विरोधी आंदोलनात बोलत होते.
दरम्यान आमदार कोरोटे व देवरी तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकार तर्फे सतत वाढविण्यात येत असलेल्या पेट्रोल,डिझेल,घरगुती गँस आणी जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढी विरोधात घरगुती गँस व मोटार सायकल फुलांचा माळ घालून निषेध केला.या आंदोलनात आमदार कोरोटे यांच्या सह देवरी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद सलामे, रंजित कासम, भरती सलामे, देवरीचे नगरसेवक सरबजीतसिंग(शैंकी) भाटिया, मोहन डोंगरे, नगरसेविका सुनीता शाहू, सरपंच सोनू नेताम, नितेश भांडारकर, आमगाव-देवरी विधानसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक(राजा) कोरोटे, काँग्रेस जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, अमित तरजूले, द्वारका धरमगुळे, रोशन भाटिया, नरेश राऊत, अविनाश टेंभरे, शार्दूल संगीडवार, माजी पं.स.सदस्य ओमराज बहेकार, रामेश्वर बहेकार, कैलास देशमुख, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, पीर खान, प्रेमचंद गुप्ता, अंतरिक्ष बहेकार, मतीन पठाण, छाया मडावी, मीना राऊत यांच्या सह काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ता सहभागी झाले होते.
नंतर पक्षाच्या वतीने देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्फत वाढत्या महागाईच्या विरोधात निवेदन सादर केले.