विधानसभा क्षेत्रातील तलावाच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार: आमदार सहषराम कोरोटे

■ देवरी तालुक्यातील घोनाडी, बोदालदंड व पलानगाव येथील तलावाची पाहणी

देवरी 01: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात अनेक लघु पाटबंधारे विभागाचे तलाव आहेत. ह्या सर्व तलावाची निर्मिती सण १९७५ च्या जवळपासची आहे. ह्या तलावात अनेक ठिकाणी असलेल्या लिकेजमुळे तलावात पाणी राहत नाही. त्यामुळे ह्या तलावाच्या जवळील शेतीला सिंचनाची सोय होत नाही. या माहितीच्या अनुसंघाणे क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील घोनाडी, बोदालदंड व पलानगाव या गावातील तलावाला बुधवारी(ता.३० मार्च) रोजी भेट देऊन ह्या तलावाची पाहणी केली. तेव्हा त्यांना तलावाच्या लिकेजमुळे तलावात पाणी राहत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी संगितले, त्यावेळी संबंधित ल.पा.तलावाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांना जागेवर बोलावून तलावाची पाणी गळती थांबविण्यासाठी संबधित कामाचे अंदाजपत्रक तैयार करून आणि त्यासाठी उपाययोजना करून ह्या तलावाचे दुरुस्ती करा अशी सूचना संबंधित कनिष्ठ अभियंता माधवानी व बिसेन यांना तर कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवहन चर्चा केली. आणि सदर कामांना त्वरित गती देण्याचे निर्देश आमदार कोरोटे यांनी दिले आणि विधानसभा क्षेत्रातील सर्व ल.पा. तलावाची दुरुस्ती झाली तर या माध्यमातून सिंचन क्षेत्रांमध्ये नक्कीच वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात अनेक लघु पाटबंधारे विभागाचे तलाव आहेत. ह्या सर्व तलावाची निर्मिती सण १९७५ च्या जवळपास ची आहे. ह्या तलावात अनेक ठिकाणी असलेल्या लिकेजमुळे तलावात पाणी राहत नाही. ह्यामुळे तलावा जवळील शेतीला सिंचनाची सोय होत नाही. ह्या तलावात अनेक लिकेज आहेत. काहींचे मेन गेट ना दुरुस्त आहेत. तुळूंग नाही, काही ठिकाणी वेस्ट वेअर नाही, कालवे ना दुरुस्त आहे. अशा कारणांमुळे तलावात पाणी राहत नाही आणि तलावाची समस्या आमदार सहषराम कोरोटे यांच्या निर्देशनात आल्याने त्यांनी बुधवारी( ता.३० मार्च) रोजी देवरी तालुक्यातील घोनाडी, बोदालदंड व पलानगाव येथील ल.पा.तलावाला भेट देऊन पाहणी केली यात तलावाचे लिकेज आढळून आले. यावेळी घोनाडी, बोदालदंड व पलानगाव येथील सरपंच व ग्रामस्थी शेतकरी यांच्याशी चर्चा केली नंतर संबंधित तलावाचे कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांना जागेवर बोलवून तलावाची पाण्याची गळती थांबविण्याकरिता व इतर दुरुस्ती च्या उपाययोजणांकरिता अंदाजपत्रक तैयार करून तलाव लवकर दुरुस्ती करा अशी सूचना विभागाचे कनिष्ठ अभियंता माधवानी व बिसेन यांना आणि कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनी वर चर्चा केली आणि सदर तिन्ही तलाव मोठे असल्याने या तलावाच्या पाण्यामुळे जवळपास ३०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे ह्या तलावातील लिकेज व इतर दुरुस्तीचे कामाचे उपाययोजना करून ह्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार कोरोटे यांनी दिले आणि विधानसभा क्षेत्रातील सर्व ल.पा.तलावाची दुरुस्ती झाली तर या माध्यमातून सिंचन क्षेत्रामध्ये नक्कीच वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आमदार कोरोटे यांनी दिली.
या प्रसंगी घोनाडी/सर्रेगावचे सरपंच सोनू नेताम, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनोबा लेंडे, बाबुराव मडावी, कीर्तन पचारे, अनिल मडावी, जगण पंढरी, रामानंद बनवेला, जयराज वाढई, काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष ओमराज बहेकार, माजी पं.स.सदस्य नरेंद्र मडावी, सरपंच अनिल सलामे, हेमराज सलामे, जितू लोणारे, राम वदेकर, प्रेमलाल मुंगणकर,भैय्यालाल कोरे, यशवंत लेंडे,छगनलाल मुंगनकर यांच्यासह तिन्ही गावातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share