देवरीत मोफत गरबा प्रशिक्षणाचा उत्साहात उदघाटन

डॉ.सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 29:
कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंधामुळे गरबा प्रेमी आणि नृत्यप्रेमींचा उत्साहावर विरजण आले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच शासनाने संपूर्ण निर्बंध हटविले आणि सर्व आस्थापने संपूर्ण क्षमतेने सुरु झाली. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील जिकडे तिकडे महोत्सव साजरे झाले.

चैत्र नवरात्राच्या पार्श्वभूमीवर देवरीत मोफत गरबा प्रशिक्षणाचे आयोजन 29 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन च्या देवरी शाखेकडून करण्यात आले असून जिप सदस्य सविता पुराम यांच्या अध्यक्षतेखाली या प्रशिक्षण सोहळ्याचा उदघाटन करण्यात आला असून प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या रझिया बेग , नगरसेविका नूतन कोवे सयाम , गरबा प्रशिक्षक निलेश सोनुले , शिल्पा बांते आदी उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणाला उत्साही महिलांनी हजेरी लावली असून 6 एप्रिल ला धुकेश्वरी मंदिर परिसरात स्पर्धा असल्याची माहिती नगरसेविका नूतन कोवे यांनी प्रहार टाईम्स ला दिली.

Share