गोंदियात 29 मार्चला तांदूळ महोत्सव जिल्हास्तरीय कार्यशाळा

गोंदिया 28: जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी जनजागृती मोहीम अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व Rice Festival तांदूळ महोत्सवाचे आयोजन 29 व 30 मार्च रोजी भवभूती रंगमंदिरात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे व तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख अथिती म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आ. परिणय फुके, आ. अभिजित वंजारी, आ. नागो गाणार, आ. विजय रहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. विनोद अग्रवाल, आमदार सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसह Rice Festival तांदूळ महोत्सवाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य, पदाधिकार्‍यांनी अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

Share