गोंदिया : डॉक्टरने दुचाकीला उडवले, कारच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

गोंदिया: तालुक्यातील अर्जुनी शिवारात 27 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन व दुचाकीमध्ये car crash अपघात होऊन पांढराबोडी येथील एकाच कुटूंबातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. योगेंद्र दमाहे (49) व फनेंद्र दमाहे (44) अशी मृतकांची तर विरेंद्र दमाहे (15) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी चारचाकी वाहनचालक डॉ. आशिष गुप्ता रा.कालीमाटी याला अटक केली आहे.

दमाहे कुटूंबातील तिघे दुचाकीने पांढराबोडी येथून कामठा येथील एका विवाह समारोहाकरिता जात असताना अर्जुनी शिवारात आरोपी डॉक्टरच्या एमएच 35/जी 5142 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीला car crash धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यात योगेंद्र दमाहे व फनेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला. तर विरेंद्र दमाहे गंभीर जखमी झाला. तर दुचाकीचे तुकडेतुकडे झाले. विरेंद्र दमाहे याला नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली भादंवि 279, 304 (अ), सहकलम 338 व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सरवदे करीत आहेत.

Share