शशीकरण जंगल परिसरात पेटला वणवा

सडक अर्जुनी: सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्‍या शशीकरण डोंगर परिसरातील बाम्हणी बीटातील जंगलात 27 मार्च रोजी वणवा पेटला. दरम्यान, ब्लोअर मशिनच्या सहाय्याने आज, 28 मार्च रोजी वणवा आटोक्यात आला.

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्राच्या रेंगेपार क्षेत्र सहायक कार्यालयातंर्गत बाम्हणी बीटातील जंगलात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणवा पेटला. घटनेची माहिती होताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व ब्लोअर मशिनच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरवात केली. मात्र जंगलातील सुकलेल्या पाल्यापाचोळ्यामुळे वणवा पसरला. दरम्यान, आज, 28 मार्च रोजी आग विझविण्यात वनविभागाला यश आहे. आग विझविण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी सुनील मडावी, रेंगेपारचे क्षेत्र सहायक एस. ए. घुगे, वनरक्षक एस. एम. पवार, टी. सी. चव्हाण, आर. जी. उईके व वनमजुरांनी परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share