आमगाव: ग्रामीण डाक सेवक डाक कर्मचारी दोन दिवसीय संपावर

आमगाव: ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉई वर्ग 3 व पोस्टमन, एम.टी.एस.च्या संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या अनुषंगाने 28 व 29 मार्च दोन दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. यातंर्गत तालुक्यातील डाक सेवक व डाक विभागीय कर्मचार्‍यांनी संप पुकारून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला.

जुनी पेन्शन योजना लागू करावी, फ्रेन्चाएझी आउटलेट व डाकमित्र योजना रद्द कावी, टपाल खात्यातील खाजगीकरणाचे धोरण थांबवावे, ट्रेड युनियनवरील हल्ले थांबवावे, युनियन पदावर राहण्यासाठी दोन टर्मची घातलेली अट रद्द करावी, जी.डी.एस. कर्मचार्‍यांना कमलेशचंद्रा कमिटीने शिफारसी लागू कराव्या, वैद्यकीय विमा, नोडल डिलीव्हरी सेंटर बंद करावे, कोविडमुळे मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये भरपाई व वारसाला अनुकंपा तत्त्वावर खात्यात नोकरी देण्यात यावी, रिक्त जागा त्वरित भराव्या, स्टाफ सिलेक्शन ऐवजी खातेनिहाय भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी यासह 21 मागण्यांसाठी हा देशव्यापी Grameen Dak Sevak संप पुकारण्यात आला आहे. या संपात डाक कर्मचारी एच. एस. सैय्यद, के. जी. मेहर, आर. जी. थेर, के. वाय. भेंडारकर, डी. एच. बिसेन, एच. एस. शहारे, एस. सी. शहारे, एच. एस. सरोजकर, ए. वाय. वाघमारे, मनीष वर्मा, आर. टी. आंबेडारे, सचिन वर्मा, अनुसया मेश्राम आदी कर्मचारी सहभागी झाले.

Print Friendly, PDF & Email
Share