पारंपारिक नृत्यावर थिरकले माजी आमदार संजय पुराम, परंपरा जपण्याचा दिला संदेश

◾️वर्षश्राद्ध निमित्त पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरीत आजच्या तरुण पिढीला दिला परंपरा जपण्याचा संदेश

डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 28:
आजच्या आधुनिकतेच्या युगात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आजच्या पिढीवर पडलेला दिसून येतो. ज्या परंपंरेने आपल्याला समाजात ओळख दिली , संस्काराचे धडे दिले त्याकडे आजची पिढी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. यातच गोंदिया जिल्हातील आमगाव देवरी विधानसभासचे माजी आमदार संजय पुराम यांनी कौटुंबिक कार्यक्रमात आपली परंपरा जपण्याचा संदेश देत चक्क आदिवासी नृत्य कलाकारांसह ठेका धरून नृत्य केला आणि अभिमानाने आपल्या संस्कृतिचा दर्शन घडविला.

माजी आमदार संजय पुराम नृत्य सादर करतांना

संजय पुराम यांच्या उत्साह बघून मित्र परिवार यांनी सुद्धा या पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरीत जल्लोष साजरा केला यावेळी आनंदाचा वातावरण निर्माण झालेला होता.

कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ( देवकारण ) त्यांच्या राहत्या घरी पुराडा येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये नातेवाईकांसह भाजप चे देवरी तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते.

Share