स्नेहाच्या रंगात रंगला नाभिक समाज

देवरी ‌ भारतात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हा सण पवित्र मानला जात असून या सणाला अनेक बंधू – भगिनी आपसातील मतभेद तथा पक्षभेद विसरुन स्नेहाने आणि आपुलकीने गुलाल उधळून एक दुसऱ्यांना रंग लावून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतात.
याच भारतीय संस्कृतीला मानाचा मुजरा करुन देवरी तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण समाजाचे आराध्य दैवत प. पू. संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या पावन भूमिवर तोरण बांधून पूजापाठ करुन धुलिवंदन रंगपंचमीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करुन एक दुसऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चेतन मेश्राम, सचिव सुरेश चन्ने, तालुकाध्यक्ष किशोर कावळे, उपाध्यक्ष शालीकराम बारसागडे, कार्याध्यक्ष ग्यानीराम बारसागडे, सहकार्याध्यक्ष राजाराम बारसागडे, सचिव ससेराज लांजेवार, सहसचिव जगदीश खडसिंगे, सलून संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन बारसागडे, उपाध्यक्ष बाळू मेश्राम, सचिव महेंद्र उरकुडे, सहसचिव महेश चन्ने, ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाल खडसिंगे, मनोहर निंभोरकर, सलून संघटक विजय बारसागडे, पृथ्वीराज नागमोते, हेतराम हटवार, युवा संघटनेचे मार्गदर्शक विनोद खडसिंगे, उपाध्यक्ष उमेश कावळे, सचिव देवेंद्र लांजेवार, सहसचिव सागर मौदेकार, संघटक उमेश चन्ने, राकेश कावळे, राकेश बानक, विरेंद्र खळसिंगे, प्रचार प्रसार प्रमुख रमेश बानक, अश्विन बारसागडे आदींनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.

Share