उधारी पडली महागात; केवळ तीनशे रुपयांसाठी केली दांडक्याने हत्या

भंडारा : भंडारा शहरात एक धक्कादायक समोर आली आहे. उधार दिलेले तीनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकड़ी दांडक्याने वार करीत एका 48 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. सतीश आनंदराव रामटेके वय 48 वर्षीय असे मृतकाचे नाव असून अमन अनिल सोनेकर वय 24 वर्ष असे आरोपीचे नाव असून आरोपी अटकेत आहे.

भंडारा शहरातील चाँदणी चौक परिसरात इंदिरा गांधी वार्ड, कुंभार टोली येथील दास यांचे लेआऊट मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहीती पोलीसांना मिळताच तात्काळ भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना मुरलीधर सदाशिव मेश्राम यांचे घराचे कुंपनाला लागुन एक व्यक्ती मृतअवस्थेत पडलेला दिसुन आला. त्याचवेळी मृत सतिश याचा भाऊ दिनेश आनंदराव रामटेके रा. राजगुरु वार्ड बजाज शाळेजवळ भंडारा यांने सदर मृत व्यक्तीस ओळखून तो त्याचा भाऊ सतिश आनंदराव रामटेके वय 48 वर्ष रा. राजगुरु वार्ड बजाज शाळेजवळ भंडारा हा असल्याचे सांगितलं.

सदर प्रकरणी कलम 174 अन्वये नोंद करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन करताच मृतक सतीश आनंदराव रामटेके यांच्या डोक्यावर गंभीर जखम दीसल्यावर भंडारा पोलिसांनी त्या अनुषंघाने तपास सुरु केल्यावर तांत्रिक तपासात आरोपी अमन अनिल सोनेकर याला 8 तासात अटक केली आहे.

आरोपीने मृतकास 300 रुपये उधारी वर दिले होते. मात्र त्याला मागुनही मृतक सतीश पैसे दयायला तयार नसल्याने अखेर आरोपी अमनने त्याला सुनसान जागी बोलावून वाद घालत उधारीचे पैसे दे म्हणून तगदा लावाला मात्र सतीश पैसे द्यायला तयार नसल्याने झालेल्या वादातून अमनने सतीशची लाकड़ी दांडक्याने वार करत हत्या केल्याचे कबूल केले आहे. ह्या प्रकरणी आरोपी अमन सोनेकर विरोधात कलम 302 ,201 अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली असून तो सध्या न्यालयीन कोठडीत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share