ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य अडकले एसीबीच्या जाळ्यात

वर्धा : ग्रामपंचायत झाडगांव (गो.) ता. जि. वर्धा येथील ग्रामसेवक सचिन भाष्करराव वैद्य (४१) आणि ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र वामनराव संदुरकर (३८) यांनी १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धाच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे सिंदी मेघे ता. जि. वर्धा येथील रहीवासी असुन खाजगी व्यवसाय करतात तक्रारदार यांना शासनाच्या रमाई योजने अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव पंचायत समीती कार्यालय, वर्धा येथे पाठविण्याकरीता ग्रामपंचायत झाडगांव (गो.) ता. जि. वर्धा येथील ग्रामसेवक सचिन भाष्करराव वैद्य यानी ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र वामनराव सदुरकर यांचे वतीने तक्रारदार यांना १५ हजार रूपये लाच रकमेची मागणी केली.तक्रारदार यांना ग्रामसेवक सचिन वैद्य व ग्रा. स. नरेंद्र संदुरकर यांनी शासनाच्या रमाई योजने अंतर्गत घरकुल मंजूर होण्याकरीता नवीन प्रस्ताव पंचायत समीती कार्यालय, वर्धा येथ पाठविण्याकरीता मागणी केलेली लाच रक्कम १५ हजार रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला. प्र. वि. वर्धा येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक देवराव खडेराव यानी गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी ग्रामसेवक सचिन भाष्करराव वैद्य ग्रां. स. नरेंद्र वा. संदुरकर यांनी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना शासनाच्या रमाई योजने अंतर्गत घरकुल मंजूर होण्याकरीता नवीन प्रस्ताव पंचायत समीती कार्यालय, वर्धा येथे पाठविण्याकरीता १५ हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम १५ हजार रूपये आरोपी ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र वामनराव संदुरकर यांचे राहते घरी २१ मार्च २०२२ रोजी स्वतः स्विकारल्याने दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो. स्टे. सावगी जि. वर्धा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर, मधुकर गिते अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि., नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक डि. सी. खडेराव, सफा रवींद्र बावणेर, पोहवा संतोष बावणकुळे, नापोको सागर भोसले, मनापोका अपर्णा गिरजापुरे, पोकॉ कैलास वालदे, पोकॉ. प्रदिप कुचनकर, चानापोकॉ निलेश महाजन सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्चा यांनी केलेली आहे.

Share