पाच राज्यांच्या निवडणुका संपताच सर्वसामान्यांच्या गॅस सिलिंडर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

दिल्ली : सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल- डिझेल दर वाढीसोबतच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसलाय. घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल ५० रुपयांनी महागलाय. यामुळे आता ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या दरात ८५ पैशाने वाढ

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दि. २२ मार्च आज मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर दरात ८५ पैशांनी वाढ केली आहे. ही वाढ १३७ दिवसानंतर झाली आहे. यामुळे आता पेट्रोल ११० रूपये १४ पैसे लिटर वरून ११० रूपये ९९ पैशांवर पोहोचले तर डिझेल ९४ रूपये ३० पैशांवरून ९५ रूपये १६ पैशांवर आले.

ही दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर होणार होती. अशी माहिती पेट्रोल पंपचालक यांनी दिली होती. मार्चमध्ये निवडणूकांचे निकाल लागताच अवघ्या आठवडा पुर्ण होताच केंद्राने ही इंधन दरवाढ केली. यामुळे आता पुन्हा एकदा वाहतुकदारांकडून गाडी भाड्यात वाढ होईल. याचा फटका महागाईला बसणार आहे. यामुळे सहाजिकच परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीवर होऊन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे.

Share