देवरी येथील आदिवासी विकास महामंडळ सोसायटीच्या हजारो क्विंटल धानाला लागली आग
◾️लाखो रूपयाचे नुकसानीची शक्यता
देवरी :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या आवारात ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे धान जळून खाक झाले. आदिवासी विकास महामंडळ सोसायटी हे झाडी झुडपी जंगलाला लागून असल्याने वणव्याच्या आगी मुळे ही आग धानाला लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वेळीच देवरी नगर पंचायतीच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली.
धानाला आगीपासून वाचविण्यात आले परंतु अग्निशमन यंत्राच्या पाण्याच्या माऱ्यामुळे धानाचे मोठे नुकसान होणार हे मात्र खरे.