डुग्गीपार पोलिसानी केला सुगंधित तंबाकू सहित ४०,६७,५८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

सडक अर्जुनी : १५ मार्च च्या रात्रदरम्यान डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे हे पोलीस स्टॉफसह हायवे दरोडा पेट्रोलींग कर्तव्यावर असतांना त्यांना मुखबीर कडुन माहिती मिळाली की, एम.एच. ४० सी.डी. ८९९० नंबरचा ट्रक सुगंधीत तंबाकु घेवून नागपुरकडे जात असून सध्या कोहमारा चौकात उभा आहे.

या माहीतीच्या आधारे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदारा सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौकात जावुन चेक केले असता वाहन क्रमांक एम. एच. ४० सी.डी. ८९१० भारत बैच कंपनिचा ६ चक्का ट्रक हा संशईतरीत्या हायवे रोडाचे बाजुला उभा दिसला सदर वाहनाजवळ आरोपी वाहन चालकाने सदर वाहनामध्ये असलेल्या मालाबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने आणी सदर वाहनातील भरलेल्या मालाबाबत संशय आल्याने सदर वाहन पो.ठाणे. ला आणले डिटेन करुन तपासणी केली असता त्यामध्ये १) पान मसाला (पान पराग) चे प्रत्येकी १० ग्रॅमचं ३००० पाकीट एकुन १० पोत्यामध्ये २) सुंगधीत तंबाकु (मजा १०८) प्रत्येकी २०० ग्रॅमचे १२०० टीन एकुण ३० पोत्यामध्ये ३) सुगंधीत तंबाकु (इगल) प्रत्येकी ४०० ग्रॅमचे ८०० पाकीटे एकुण २० पोत्यामध्ये ४) सुगंधीत तंबाकु (रिमझीम) चे प्रत्येकी १००० ग्रॅमचे ७२० पाकीटे एकूण १८ पोत्यामध्ये ५) सुगंधीत तंबाकु (मजा २०८) चे प्रत्येकी ५०० ग्रॅमचे १६० टिन एकुण १० पांत्यामध्ये ६) सुगंधीत तंबाकु (बागबान ) चे प्रत्येकी ५०० ग्रॅमचे ३२० टिन एकुण १० पोत्यामध्ये असे कि. २५.६७,५८०/- रुपये व ट्रक अंदाजे कि. १५,०००००/- असा एकुण किंमती ४०,६७,५८०/- रुपयाचा मुद्देमाल पो.स्टे. ला जमा केला.

ट्रकमधील प्रतिबंधीत सुंगधी तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषय प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करून त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी १) गौरव सुदाम खंडाईत वय ३४ वर्ष २) मेहुल चंद्रकात भद्रा दोन्ही रा. नागपुर यांचे विरुदध अप. क्र. ५२ / २०२२ कलम १८८,२७२,२७३,३२८ भादवी सहकलम 3, 26 (2) (i) (ZZ) (V), 26 (2) (iv) 27 (3) (c) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपो व्यकंट नागपुरे, पोना जगदिश मेश्राम चापोहवा रमेश हलामी यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share