गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी टीव्ही 9 चे शाहिद पठाण

◾️ टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी आहेत शाहिद पठाण

देवरी 17: ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचा पाढा प्रशासनासमोर व शासन दरबारी मांडण्याचे धाडस ठेवणाऱ्या पत्रकारितेला लोकशाहीचा 4 स्तंभ संबोधले जाते.

देवरी सारख्या नक्षलग्रस्त , आदिवासी भागातील समस्या , प्रशासनाचे कारभार , भ्रष्टाचार , आरोग्य , रस्ते विषयी जनतेचे प्रश्न मांडण्याची महत्वाची भूमिका पत्रकार करीत असतात. याचीच प्रचिती म्हणून कार्याची दखल घेत टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी शाहिद पठाण यांना जिल्हा पत्रकार संघाची जबाबदारी देण्यात आली असून वीरेंद जयस्वाल यांनी उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीबद्दल शाहिद पठाण प्रहार टाईम्स चे संपादक डॉ सुजित टेटे , देवरीचे वरिष्ठ पत्रकार मित्र मंडळी यांच्यासह सर्व स्तरावर कौतुक आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

Print Friendly, PDF & Email
Share