होळी, धुळवड साजरा करणार आहात?…आधी वाचा नियमावली
मुंबई: होळीच्या सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत. रात्री दहाच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घातली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास देखील कारवाई केली जाणार आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये अशी देखील सूचना देण्यात आली आहे. जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे.
काय आहे नियमावली?
रात्री दहाच्या आत होळी करावी
दहाच्या आत होळी लावणे बंधनकारक
डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर बंदी
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये,जोरात लावल्यास कारवाई
कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये