महिलांनो, कॅन्सर स्क्रिनिंग करा : जिल्हाधिकारी नयना गुंडे

गोंदिया : जागतिक महिला दिनानिमित्त केटीएस जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पचे उदघाटन गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आले. यात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले असून, महिलांनी कॅन्सर स्क्रिनिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.   

या वेळी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे, प्रसूती विभाग प्रमुख डॉ.पाटील, डॉ.सागर सोनारे आणि कॅन्सर जनजागृती प्रमुख डॉ.सुवर्णा हुबेकर व एनसीडी समनव्ययक स्नेहा वंजारी, डॉ.सुरेखा आझाद बोरकर व नगरसेविका भावना कदम, बाजपाई ड्राइविंग स्कूलच्या संचालिका लता बाजपाई, आधार महिला संघटनेच्या सीमा डोये व सविता बेदरकर, माधुरी लाड, शुक्ला सिस्टर्स आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.नयना गुंडे म्हणाल्या, आजकाल महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे. प्रतिबंध हाच एक उपाय आहे. त्यामुळे चाळीशीतील महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व कॅन्सर स्क्रिनिंग करून घ्यावी. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे यांनी सांगितले की, महिला या कुटुंबाच्या केंद्रबिंदू असूनही स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करतात. म्हणून आता प्रत्येक सरकारी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये ब्लॉक लेवललादेखील असे मोफत कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन केले आहे, त्याचा लाभ घ्या! 

प्रसूती व स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ.राजश्री पाटील यांनी सांगितले की, बीजीडब्लूच्या ओपीडीमध्ये प्याप्स समेयेर तपासनी मोफत उपलब्ध आहे. स्तन कॅन्सर व गर्भाशय कॅन्सरबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली व जागतिक महिला दिनाच्या पर्वावर स्वतः ची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात स्तन कॅन्सर प्रतिबंधबाबत आरोग्य प्रदर्शनी व सेल्फी स्टँड लावले होते. ते महिलांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले होते. डॉ.सुरेखा आझाद बोरकर यांच्या नेतृत्वात पिंक रिब्बन क्लबची स्थापना करण्यात आली. या वेळी स्वाती बनसोड, अर्चना वासनिक, पल्लवी राऊत, रुपाली टोने, स्वाती बावनकार आदींनी कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share