गोंदियाकरांची स्वप्नपूर्ती गोंदियाच्या बिरशी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचे आज पहिल्यांदा झाले टेकऑफ
◾️७९ वर्षानंतर उडाले पहिल्यांदा प्रवासी विमान
गोंदिया: गोंदियाच्या बिर्शी विमानतळावरून तब्ब्ल ७९ वर्षा नंतर आज प्रवाशी वाहतूक विमान सेवेला सुरवात करण्यात आली असून याचे उदघाटन केंद्रीय उद्यान मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर येथून करण्यात आले तर .गोंदिया ते हेंद्राबाद या विमान सेवेला गोंदिया विमानतळा वरून खा सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी या ७२ सीटर विमानात ६५ लोकांनी या विमान सेवेचा लाभ घेतला असून माजी केंद्रीय मंत्री खा प्रफुल पटेल यांच्या हस्ते २००८ मध्ये या अत्याधुनिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून . स्वतः उद्यान मंत्री जोतिरादित्य सिंधिया आणि खा सुनील मेंढे यांनी देखील या उद्घटना प्रसंगी खा प्रफुल पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला असून .प्रफुल पटेलांच्या स्वप्नांना मुळेच उशिरा का होईना आज गोंदिया कराना प्रथमच या विमानतळाचा लाभ घेता आला.
गोंदिया शहराला लागून असेलल्या बिर्शी गावात ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२-४३ आली बिर्शी विमानतळाची उभारणी केली होती. मात्र स्वातंत्र्या आधी हा विमानतळ पूर्णतः नासधूस झाल्याने २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस आज प्रारंभ झाला आहे. फ्लायबिग कंपनीचा प्रवासी विमान इंदौर विमानतळावरून सकाळी ९.३० सुटेल आणि गोंदिया विमानतळावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी १ वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून वेळापत्रकानुसार नियमित विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार असून आज प्रवास्यांनी देखील माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आणि खा सुनील मेंढे यांचे आभार मानले आहे. तर लवकरच प्रफुल पटेलांच्या माध्यमातून गोंदिया ते मुंबई- पुणे अशी विमान सेवा सुरु करणार असल्याने माजी आमदार राजेंद्र जैन यावेळी म्हणाले.