पत्रकार संघाने केला स्वच्छता दूतांचा सत्कार

देवरी दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण ८ मार्चला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम देवरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात देवरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष संजय उईके यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता दूत असलेल्या एकूण दहा महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार आणि माजी अध्यक्ष फाविंद्र हाडगे यांची उपस्थिती होती. या जागतिक महिला दिनानिमित्त नगर पंचायत येथील स्वच्छतादूत म्हणून कामावर असलेल्या सहा महिला, धुकेश्वरी मंदिरातील दोन महिला, पती आणि मुलगा नसलेली एक महिला आणि घरकाम करणारी एक महिला अशा एकूण दहा महिलां भगिनींचा श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि जीवनावश्यक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याचे संचालन सचिव सुरेश चन्ने, प्रास्ताविक ॲड. प्रशांत संगीडवार तर, सर्वांचे आभार माजी अध्यक्ष फावींद्र हाडगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जुबीन खान, कोषाध्यक्ष सुनिल चोपकर, संघटक देवेंद्र सेलोकर, संजय तरोणे आणि प्रचार प्रसार सहप्रमुख शाहिद पठाण आदींनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share