भाजप महिला आघाडीने केला सामाजिक भगिनींचा सत्कार
देवरी – दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने ९ मार्चला स्थानिक भाजप कार्यालयात तालुकाध्यक्षा देवकी मरई यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मिरा शिवणकर, सुमित्रा परतेती, जयतुरा पटले आणि तारा पटले अशा चार ज्येष्ठ सामाजिक महिला भगिनींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने जि. प. सदस्या सविता पुराम, माजी सदस्या गोमती तितराम, सुनिता गावडकर, माया निर्वाण, नगर पंचायतच्या उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, सरपंच अंजू बिसेन, पुष्पा मडावी, महामंत्री अंबिका बंजार, नगर पंचायत सदस्या कमल मेश्राम, सीता रंगारी, पिंकी कटकवार, लक्ष्मी पंचमवार, डिलेश्वरी बिंझाडे, रोहिणी कावळे, उर्मिला परिहार, सेवंता सरोदे, सुषमा वैद्य, भाग्यश्री सोनटक्के, तेजश्री चोपकर, ललीता रामटेके, अर्चना येटरे, लता बडोले, वंदना दहिकर आणि राधिका सर्पे अशा अनेक महिला भगिनींची उपस्थिती होती.