गोंदिया पोलीस आणि नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात एक संशयित नक्षली जखमी

हेलिकॉप्टरने जखमी नक्षलवादयाला उपचारासाठी नागपूर ला हलवले

देवरी 12: गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या मगरडोह पोलिस दूरसंचार केंद्राच्या पोलीस पार्टी आणि नक्षलवाद्यांच्या आज झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवादी गोळीबारात जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हेलीकॅपटर च्या माध्यमातून उपचारा करिता नागपूरला हलविले असून जखमींवर नागपुरात उपचार सुरु आहे.

गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शस्त्र दूरसंचार केंद्र मगरडोहची पोलीस पार्टी राणीडोहच्या जंगलात आज सकाळी पेट्रोलींग करीत असताना अज्ञात नक्षल वाद्यांना कडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला असून या हल्याया प्रतिउत्तर देताना एका संशयित नक्षल वाद्याला गोळी लागल्यावर जखमी झाला असून इत्तर नक्षली त्याला सोडून पडून गेले असता पोलिसांनी या जखमी नक्षल वाद्याला ताब्यात घेत प्राथमिक उपचारासाठी देवरी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंता.जनक होत असल्याने त्याला हॅलीकॅपटर च्या माध्यमातून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे . मात्र हा संशयित नक्षली कुठल्या पार्टीचा आहे याची अद्यापही ओळख पटू शकली नसली तरी देवरी पोलिसांच्या वतीने आज संध्याकाळ पर्यंत देखील जंगल भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share