साई सर्वेश्वरबारमध्ये झालेल्या चोरीचा तपास दोन दिवसात लावून पोलिसांनी चोरांना केले गजाआड

अर्जुनी-मोर 5 :येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या साई सर्वेश्वरबारमध्ये झालेल्या चोरीचा तपास दोन दिवसात लावून पोलिसांनी चोरांना गजाआड करीत मुद्देमाल हस्तगत केला आहे.सविस्तर असे की, 01 मार्च रोजी पहाटे अर्जुनी-मोर मधील साई सर्वेश्वर बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.त्याप्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्याकडे सोपवला.सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली.

घटनास्थळावरून मिळालेले भौतिक पुरावे, सीसीटीवी फुटेज मधून मिळालेले आरोपींचे वर्णन, गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 2 आरोपी दीपक राणा व सुशांत मिस्त्री रा. दोघे वडसा यांना अटक केली. अर्जुनी-मोर पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.गुन्ह्यातील आरोपी यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 07/03/2022 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा तपास मा. प्रभारी पोलीस अधीक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, राहुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ कापगते, चंद्रकांत करपे तसेच पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे यांनी केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेल गोंदियाचे पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी मोलाची मदत केली.

Print Friendly, PDF & Email
Share