छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे निरोप कार्यक्रमाचे आयोजन

देवरी २३:-छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे वर्ग- १० च्या विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमाचे आयोजन सोमवार (ता.२१)रोजी विद्यालयाच्या सभग्रुहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एम.जी.भुरे सर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संजयजी भगवतकर , मनोजजी गेडाम सर आणी देवरी चे वरिष्ठ पत्रकार नंदुप्रसादजी शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम माँ शारदा व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून वर्ग- १० च्या पुष्पदिप कवाडकर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तदनंतर वर्ग १०व ९च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींनी वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमानिमित्त लाभलेले प्रमुख अतिथी पत्रकार नंदुप्रसादजी शर्मा यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग-१० च्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक आठवण म्हणून भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक पी. एस. खैरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन कु. जान्हवी खोटेले व कु.विद्या कापगते यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. लिना शेडमाके हिने मानले. अशाप्रकारे या कार्यक्रमाला सर्व वर्ग-९ व १०चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share