देवरी नगरपंचायतीवर भाजपचे महेश जैन आणि काँग्रेसचे शकील कुरेशी स्विकृत सदस्य

◾️विविध समित्यांची झाली स्थापना

देवरी 22: नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष, विविध समित्याचीं स्थापना आणि स्विकृत सदस्यांकडे कडे होते. आज मंगळवारला देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर ( भा प्र से ) यांच्या उपस्थीतीत सर्व समित्याची स्थापना आणि स्विकृत सदस्यांची निवड देवरी नगरपंचायतीच्या सभा भवनात संपन्न झाली.

भाजप आणि काँग्रेस ने आपले चेहरे समोर करत भाजप तर्फे महेश जैन यांना दुसऱ्यांदा स्विकृत सदस्य म्हणून पाठविण्यात आले असून काँग्रेस तर्फे शकील कुरेशी यांच्या वर्णी स्विकृत सदस्यत्व मिळाले आहे. स्वच्छता व आरोग्य समितिची अध्यक्षता उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार , अर्थ व नियोजन समितिची अध्यक्षता संजय दरवडे , महिला व बाल कल्याण समितिची अध्यक्षा तनुजा भेलावे आणि बांधकाम समिति चे अध्यक्ष आफताब शेख़ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांग्रेस तर्फे सरबजीतसिंह भाटिया बांधकाम , सुनिता ओंकार शाहू महिला व बाल कल्याण,मोहन डोंगरे स्वच्छता व आरोग्य आणि नितीन मेश्राम अर्थ व नियोजन समितिमध्ये यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी आमदार सहसराम कोरोटे, भाजपा तहसील अध्यक्ष अनिल येरणे आणि पदाधिकाऱ्यांनी स्विकृत सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

◾️कोण कोण होते दावेदार , शेवट पर्यंत सस्पेन्स होता कायम :

नगर पंचायत निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून भाजपा चे संजू उईके व प्रज्ञा संगीडवार यांची निर्विरोध निवड झाली त्यानंतर भाजप आणि कांग्रेस तर्फे स्वीकृत सदस्यांच्या नावावर सस्पेंस कायम होता.
भाजपा तर्फे पुर्व गटनेता संतोष तिवारी , पुर्व स्वीकृत सदस्य अनिल अग्रवाल तथा द भंडारा अर्बन बैंक चे पूर्व अध्यक्ष महेश जैन, एड भूषण मस्करे, महामंत्री प्रवीण दहिकर, बंटी भाटिया,राजू शाहू यांच्या सारख्या तगड्या पदाधिकाऱ्यांची लांब यादी होती परंतु शेवट पर्यंत भाजपनी आपले सस्पेन्स कायम ठेवले होते. दरम्यान महेश जैन यांना दुसऱ्यांदा स्वीकृत सदस्य म्हणून निवडले असून कांग्रेस तर्फे शकिल कुरैशी , उपसरपंच तथा वरिष्ठ नेता परमजीत सिंह भाटिया, पुर्व सभापती व पुर्व तहसील अध्यक्ष राधेश्याम बगड़ीया, कांग्रेस लीगल सेल चे प्रमुख एड प्रशांत संगीडवार यांच्या सारखे दावेदार होते. परंतु आमदार सहसराम कोरोटे यांनी शकिल कुरैशी यांची निवड करून सर्वसाधारण कार्यकर्त्या सोबत त्यांची पार्टी उभी आहे असा संदेश दिला.

Print Friendly, PDF & Email
Share