क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करायचे असेल तर कठिन परिश्रम घेणे गरजेचे आहे- आमदार सहषराम कोरोटे

■ देवरी येथे जिल्हास्तरिय ओपन कबड्डी स्पर्धेचे थाटात आयोजन

देवरी: राज्यासह देशात अनेक राष्ट्रीय खेळाचे स्पर्धा घेतले जातात. यात कबड्डी हे सुद्धा खेळ खेळले जाते. या क्षेत्रातील युवक युवतींनी क्रीड़ा क्षेत्रात यश प्राप्त करावा या करिता देवरी येथे जिल्हास्तरिय ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या देशाचे नागरिक बलवान तो देश बलवान असे म्हटले जाते. आपले शरीर सदृढ़ ठेवन्याकरिता खेळाचे महत्व आहे. जर क्रीड़ा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करायचे असेल तर कठिन परीश्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी येथील क्रीड़ा संकुलनात शुक्रवार( ता.१८ फेब्रूवारी) रोजी युवा एकता क्रीड़ा बहुउद्देशीय संस्था फुलचुर/गोंदिया द्वारे आयोजित जिल्हा स्तरीय ओपन क्रीड़ा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या स्पर्धेचे उदघाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी नवनिर्वाचित जि.प.सदस्य राधिकाताई धरमगुळे, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रंजीत कासम, नगरसेवक सरबजीत सिंग भाटिया(शैंकी), मोहन डोंगरे, देवरी तालुका क्रीड़ा अधिकारी ए.बी.मरसकोल्हे, माजी पं.स.सदस्य ओमराज बहेकार, कुलदीप गुप्ता, घसरन धरमगुळे, परमजीतसिंग भाटिया(जित्ते भैया), जीवन सलामे यांच्या सह देवरी शहरातील क्रीड़ा प्रेमी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, कबड्डी खेळाचे स्पर्धक, आयोजन संस्थेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार कोरोटे पुढे म्हणाले की, आता काही दिवसापूर्वी शासनाने एक जी.आर. काढले आहे. त्याचप्रमाणे देवरी, सालेकसा व आमगांव तालुक्यातील क्रीड़ा संकुलनाच्या विकासाकरिता प्रत्येकि ५ कोटि असे एकूण १५ कोटि रुपये आपल्या विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्याला मिळणार आहे. तसेच विधानसभेतील तिन्ही तालुक्यातील क्रीड़ा संकुलनाच्या चांगल्या सोई सुविधे, स्वीमिंग पुल, स्टेडियम व सर्व खेळाच्या साहित्याकरिता देवरी साठी २२ कोटि ७० लक्ष, सालेकसा करिता १८ कोटि व आमगांव करिता २१ कोटि अशा प्रकारे एकूण ६१ कोटि ७० लक्ष रूपयाच्या निधीचे प्रस्ताव तैयार करुण शासनाला पाठविन्यात आले आहे. या प्रस्तावाला आता लवकरच मंजूरी मिळणार आहे असे म्हटले.
या स्पर्धा उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरी तालुका क्रीड़ा अधिकारी ए.बी.मरसकोल्हे यांनी तर संचालन अंकुश गजभिये यांनी आणि उपस्थितांचे आभार आयोजक संस्थेचे अध्यक्ष ऋतुराज यादव यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share