भेल प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न

आमगाव :गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील रखडलेला भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेडचा प्रकल्प विदर्भातील मोठा प्रकल्प आहे. दोन्ही जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. प्रकल्पात काय उणिवा आहेत यासाठी भारी उद्योग मंत्री आणि विभागाशी चर्चा करून हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकास व इस्पात केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगीतले.

भेल प्रकल्पाची सुरवात 2016 साली करण्यात आली. प्रकल्प 480 एकर भूमीत उभारण्यात येत आहे. यासाठी 2731 कोटींची निधी मंजूर करण्यात आले. या प्रकल्पात तीन हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रकल्पात तांत्रिक पदे भरण्यासाठी जाहिराती देण्यात आली होती. परंतु हा प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद पडला. आता पुन्हा हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्ह्यात विपुल प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहे. यावर उपयोगी प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेईल. यासाठी नियोजन आहे. कचारगड हे आशियातील मोठे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. यातील विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमाने पर्यटन विकासावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी विकास निधीतून निधी उपलब्ध करून देणाची ग्वाही देखील कुलस्ते यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share