पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

अहेरी : अहेरी येथील पविरहाऊस कॉलोनी मधील एका अपार्टमेंट मध्ये पोलीस शिपायाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
प्रमोद शेकोकर असे पोलीस शिपायाचे नाव असून ते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचयाकडे सुरक्षा गार्ड म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झाल्याची माहिती आहे. त्यांची पत्नी ही ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे.
घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक श्यामदा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरवाजा बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आसमध्ये प्रवेश केला. आत्महत्यचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रमोद शेककर हे मूळ बुलढाणा जिल्ह्याचे असल्याची माहिती आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें