नगरसेविका पिंकी पारस कटकवार यांचा स्तुत्य उपक्रम, लग्न वाढदिवशी केली रुग्णसेवा

देवरी 18: समाजाने आपल्यासाठी काय केले? त्यापेक्षा समाजासाठी आपण काय करू शकतो ? याचे मार्मिक उदाहरण देणारे नक्षलग्रस्त,आदिवासी भागात समाजकार्यात स्वतःला वाहून देणारे जोडपे म्हणजे देवरी तालुकयातील नवनियुक्त नगरसेविका पिंकी कटकवार आणि त्यांचे पती पारस कटकवार.

आजच्या युगात आपल्या नावासमोर सामाजिक कार्यकर्ता असा मोठा नाव लिहून मिरवणाऱ्यांची संख्या कमी नाही, एक दिवस गरिबाला मदत करून गाजावाजा करणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. परंतु आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी आपण काय करू शकतो अशी निस्वार्थ सेवा करणाऱ्या कटकवार जोडप्यानी आपल्या 18 व्या लग्न वाढदिवसानिमित्ताने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात फळे आणि बिस्किटांचे वाटप करून आगळेवेगळे लग्नवाढदिवस साजरे केले. यांच्या उपक्रमाला आणि सामाजिक कार्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

खरंतर या जोडप्यासाठी आजचे कार्य नवीन नाही, या अगोदर रुग्णांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था , आरोग्य शिबीर , मोफत चष्मे वाटप आणि कोरोना काळात गरिबांना केलेली मदत अशा विविध सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. याचेच फळ म्हणून नुकतेच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी जिंकून येणारे उमेदवार म्हणून देखील मान मिळाला. यांचे हे समाजहित आणि समाजासाठी केलेले उपक्रम असेच चालत राहो, अशा खऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Share