डोंगरगाव येथे पहिली शिक्षण परिषद थाटात संपन्न
देवरी 18: तालुक्यातील डोंगरगाव केंद्राची पहिली शिक्षण परिषद येथील बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या शिक्षण परिषदेला केंद्रातील वर्ग 1ते 8 ला शिकविणारे सर्व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षण परिषदेचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून
नाडे मॅडम (अधिव्याख्याता) डायट गोंदिया, अध्यक्ष– बोरकर सर( प्राचार्य) बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव, प्रमुख अतिथी वलथरे सर साधन व्यक्तीं ,समुह साधन केंद्र देवरी हे होते. सदर शिक्षण सभेचे प्रास्ताविक सुरेंद्र जगणे (केंद्र प्रमुख डोंगरगाव) यांनी केले. मा. नाडे मॅडम अधिव्याख्याता डायट गोंदिया यांनी शिक्षण परिषदेचे महत्त्व व विद्यार्थ्यांना सध्या च्या परिस्थितीत कसे शिकवावे.या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. सुरेंद्र जगणे केंद्र प्रमुख डोंगरगाव यांनी खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. 100 दिवस वाचन अभियान, स्पर्धा परीक्षा -भरारी द्वारे नियोजन, Read .to me App द्वारे शिक्षण, अमृत महोत्सव कार्यक्रम मुद्दे मांडण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रात – भाषा विषयाचे मार्गदर्शन ,सुलभक शिक्षिका कु. वर्षा वालदे जि.प. शाळा सावली यांनी भाषा स्तर आधारित उजळणी द्वारे संपूर्ण भाषा विषय अध्ययन अध्यापन पद्धती समजावून सांगितले.
दुसऱ्या सत्रात गणित विषयाचे मार्गदर्शन ,सुलभक – कु.ज्योती पटले जि.प.शाळा पाऊळदौना यांनी गणित चाचणी चे स्तर , गणित विषयावर कृती युक्त शिक्षण व शैक्षणिक गणित पेटी द्वारे शिक्षण कसे शिकवावे, या विषयावर सखोल अध्ययन अध्यापन केले.कार्यक्रमाचे संचालन ए.बी. उईके पाऊळदौना यांनी मानले व कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार प्रदर्शन दिपक कापसे, सावली यांनी मानले.