जिल्हा परिषदच्या काँग्रेस गटनेतेपदी संदिप भाटिया यांची निवड

गोंदिया १८: जिल्हा परिषद निवडणुकीत दुसरा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने विजय मिळवीला. गुरूवारी(ता.१७फेब्रुवारी) रोजी जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस गटनेता म्हूणन देवरी तालुक्यातील भर्रेगाव जिल्हा परिषद क्षेतातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य संदिप भाटिया यांची निवड झाल्याचे काँग्रेस पक्षाच्या १३ सदस्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना पत्र सादर केले. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यावेळी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यासमोर भाटिया यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली.
याप्रसंगी आमगावं-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, माजी जिल्हध्यक्ष पुरुषोत्तम कटरे ,प्रदेश कमेटीचे सचीव अमर वराडे, जिल्हा उपाध्यक्ष गप्पु गुप्ता, वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता यादनलाल बनोटे, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, जिल्हा महासचीव बळीराम कोटवार , सर्वषश्री राजु काळे ,द्वारकाप्रसाद धरमगुडे, जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे,उषाताई शहारे , विमलताई कटरे,जितेंद्र कटरे, वंदनाताई काळे गीताताई लिल्हारे , छायाताई नागपुरे,राधिकाताई धरमगुडे , छबुताई उके,कविताई कापगते,शसेंद्रजी भगत,श्रीकांतजी घाटबांधे,जितेंद्रजी लिल्हारे पं.स. सदस्य,नंदु कोरे ,पं.स. सदस्य,पप्पू पटले,अनिल गौतम,योगेश अग्रवाल,जहिर अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share