देवरी: सालेगाव प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता लवकरचं पाणी मिळणार
देवरी १८: सतत पडणारा दुष्काळ व उन्हाळी धान पिकाच्या लागवड क्षेत्राकरिता शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याच्या जलसंपदा विभागासी सतत पाठपुरावा व प्रयत्न केल्याने देवरी तालुक्यातील सालेगाव येथील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे.
प्रसिद्धि पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की वारंवार पडणारा दुष्काळ व उन्हाळी धानपिकाच्या लागवड क्षेत्राच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांना पानी मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला धरून आमदार कोरोटे यांनी दि. १४/१०/२०२१ रोजी शासनाच्या जलसंपदा विभागास पत्र सादर करुण या विभागासी सतत पाठपुरावा व प्रयत्न केले.
आमदार कोरोटे यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपुर येथील कार्यकारी अभियंता यांनी लवकरच सालेगाव लघुपाटबंधारे प्रकल्प देवरी या जलाशयात बाघनदी वरुण पानी उचल करुण या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पानी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.
या करिता सर्वेक्षणाचे काम त्वरित सुरु होणार असून या सर्वेक्षणाच्या अहवाल सादर केल्यानंतर या प्रकलपातुन पानी सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता भंडारा यांनी दि.२२/०१/२०२२ रोजीच्या पत्रन्वये दिली आहे.
आमदार कोरोटे यांच्या सतत च्या पाठपुरावा व प्रयत्नामुळे आता सालेगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पानी मिळणार असल्याने या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करुण आभार मानले आहे.