क्या बात ! बंद वाचनालयात सॅनिटायझरवर तब्बल ७५ लाख रूपये खर्च
नागपूर : येथील महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सध्या सुरु असताना शिक्षण, ग्रंथालय विभागाचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. बंद असलेल्या ग्रंथालयासाठी सॅनिटायझरवर तब्बल 75 लाख रूपये खर्च झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये ग्रंथालय बंद असताना विभागानं तब्बल 75 लाखांचे सॅनिटायर वापरल्याचे देयक दाखवले. ग्रंथालय बंद होते तर मग हे सॅनिटायझर कुणी वापरले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
सॅनिटायझर खरेदीची बोगस बिले सादर करण्यात आली आहेत.
हा घोटाळा केवळ सॅनिटायझरपुरता मर्यादित नाही. स्टेशनरी विभागात अशाच प्रकारे बरीच बेकायदेशीर बिलवसुली झाल्याची चर्चा आहे. आता कोरोना संकटात कुणा कुणाची चांदी झाली हे लवकरच स्पष्ट होईल.