नागपूर: चक्क टेडी बिअर जाळत ‘व्हॅलेटाईन डे’ला विरोध!

नागपूर : सगळीकडे व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू आहे. उद्याच व्हॅलेंटाईन डे असल्याने सर्वत्र प्रेमचा बहर आला आहे. मात्र अशात या प्रेमाचा दिवस साजरा करण्याला विरोध दिसून येत आहे. बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदने नागपुरात इशारा रॅली नावाने याविरोधात आंदोलन केले आहे. व्हॅलेंटाईनडे चा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. यांनी चक्क टेडी बिअर जाळत विरोध केल्याचे दिसून आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. नागपूरच्या तेलंगखेडी परिसरात हे आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यावर किंवा गार्डमध्ये प्रेम व्यक्त करण्यावर आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला यांचा विरोध आहे. त्यामुळे नागपुरातल्या प्रेमींना जरा जपून राहवं लागणार आहे.

हिंदू राष्ट्र सेनाही आक्रमक:

व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावात हिंदूराष्ट्र सेनेनेही प्रेमीयुगुलांना इशारा दिलाय. हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते शहरातील उद्याने, महाविद्यालयांसह पर्यटनाच्या ठिकाणी रॅली काढत तरुणांचं प्रबोधन करणार आहेत. व्हॅलेंटाईन डे साजरा करणं ही पाश्चात्य कूप्रथा आहे. ती बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन प्रबोधन करण्यात येणार आहे. सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात येईल. शहरातील महाविद्यालये, सार्वजनिक उद्याने, मेहरून तलाव, लांडोरखोरी परिसर कोल्हे हिल्स, हनुमान खोरे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जाऊन तरुणांमध्ये प्रबोधन करण्यात असल्याची माहिती या संघटनेकडून देण्यात आलीय. यावेळी व्हॅलेंटाइन डे साजरा करताना प्रेमीयुगुल आढळून आल्यास त्यांचा जागेवरच विवाह लावून देण्यात येईल असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी दिलाय.

शिवसेनेचाही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला विरोध

दुसरीकडे सोमवारी व्हॅलेंटाईन डेला प्रेमीयुगुलांना रोखण्यासाठी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली. काही शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यासाठी काठ्यांची पूजाही केली आहे! ‘भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में’ अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठ्याही दाखवल्या आहेत. इतकंच नाही तर “पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना”, अशा घोषणाबाजीतून त्यांनी पेमीयुगुलांना थेट इशाराच दिलाय. त्यामुळे काही प्रमी युगलांच्या आनंदात विर्जन पडण्याची दाट शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share