गोंदिया जिल्हा परिषदेतील कबाडीची विक्री,सायकांळच्यावेळी साहित्याची रवानगी

गोंदिया 13: जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या प्रशासकीय ईमारतीमधील विविध विभागात असलेल्या खुर्च्या,आलमारी,टेबल,पंखे,रॅकसारख्या वस्तुंची कबाडी म्हणून लिलाव करुन विक्री करण्यात आली.वास्तविक या साहित्याच्या विक्रीसाठी कधी लिलाव करण्यात आले याबदद्ल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.यापुर्वी संगणकाचीही विक्री करण्यात आली.तर दोन महिन्यापुर्वी काही गाड्या लिलाव करण्यात आल्या.विशेष म्हणजे संगणक विक्रीसह या साहित्यांची निविदा कधी निघाल्या याबद्दल माहित नसल्याचे अनेकांनी सांगितले.शुक्रवारला जेव्हा सायकांळी 4 वाजेनंतर चार ते पाच गाड्या साहित्य नेण्यासाठी वित्तविभाग असलेल्या भागाकडील प्रवेशव्दारावर लागल्यानंतर चर्चांना उधाण आले.जो प्रवेशव्दारकोरोना काळ म्हणून कधीही उघडला नव्हता तो मात्र या कबाड साहित्याची विल्वेहाट लावण्यसाठी उघडल्याचेही बोलले जात होते.विशेष म्हणजे साहित्य लिलावासाठीच्या निविदाच कधी निघतात हे कळायला मार्ग राहिलेला नाही.चारचाकी वाहनांचेही लिलावप्रकियेवर काहींनी शंका व्यक्त केली आहे.तर काही वाहने सध्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधून गायब असल्याने ते वाहन नादुरूस्त आहेत की कुठे हा संशोधनचा विषय राहणार आहे.(साहित्य वाहनात भरतानाचा बघा व्हिडीओ)

दरम्यान या कबाडी संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी दोन महिन्यापुर्वीच काही साहित्यांचे लिलाव झाले होते.मात्र आज कुठल्या साहित्याची ने आण होत आहे याबद्दल माहीती नसल्याचे सांगत ते साहित्य डीआरडीएचे असू शकतात असे म्हणाले.

Share