चेक बाउंस च्या आरोपीला एक वर्षाची सजा व दहा लाख रुपये दंड

देवरी १२: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात अर्जदार हनुमान प्रसाद अग्रवाल यांनी भंडारा येथील सय्यद मोहम्मद अली नूर अली यांच्या विरोधात दाखल केलेल्या चेक बाउन्स केस मध्ये देवरी येथील न्यायाधीश श्री मोहम्मद वसीम अक्रम शेख यांनी आरोपीला एक वर्षाची सजा देऊन रुपये 10 लाख दंड केला.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी सय्यद मोहम्मद अली नूर अली हा प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतो. त्यांनी देवरी येथील आदिवासीच्या जमिनीत प्लॉट पाडून त्यापैकी तीन प्लॉटच्या सौदा तक्रार करता हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्याशी केला आणि त्यांच्याकडून ५,२०,००० रुपये घेतले. जेव्हा तक्रार करत्याला माहीत झाले की त्याची फसवणूक झाली आहे तेव्हा त्याने आरोपीला आपले पैसे परत मागणे सुरू केले. तेव्हा आरोपींनी तक्रार कर्त्याला युनियन बँक भंडारा येथील चेक क्रमांक ०२९०६५ दिला पण सदर चेक न वठल्यामूळे तक्रार कर्त्याने देवरी येथील न्यायालयात फौजदारी मामला क्रमांक ३२/२०१६ दाखल केला. आरोपीने पहिल्यांदा आपला राहण्याच्या पत्ता बदलवून नोटीस घेण्याचे टाळल व नोटीस मिळाल्यानंतर वारंवार गैरहजर राहून केस लांबवण्याचे प्रयत्न केले. पण तो कायद्यापासून वाचू शकला नाही व शेवटी न्यायालयाने साक्षीपुरावे तपासून आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध झाल्यामुळे दि. ०९-०२-२०२२ रोजी आरोपीला एक वर्षाची सजा व १०,००,००० रुपये दंड ठोठावला

सदर केसमध्ये तक्रारकर्त्या तर्फे अॅड. प्रशांत संगीडवार देवरी व अॅड. आशा भाजीपाले देवरी तर आरोपीतर्फे अॅड. भुसारी लाखणी व अॅड. मुकेश शहारे देवरी यांनी पेहरवी केली.

Share