गोंदिया जिल्ह्यात 14 फेबुवारीपासून इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग सुरु
गोंदिया 11 : जिल्हयात कोरोना व ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी होत असल्यामुळे 14 फेब्रुवारीपासून जिल्हयातील इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली (दि.09)झालेल्या बैठकीत दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 7 वी चे वर्ग 14 फेबुवारीपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
जिल्हयात साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हयातील विद्यार्थ्यांकरीता नियमीतरित्या शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरु ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. या आधीच इयत्ता 9 वी पासुन महाविद्यालयासह शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, त्यासोबतच आता इयत्ता 1 ली पासुनच्या शाळा 14 फेब्रुवारी 2022 पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे.