विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक आव्हान स्विकारावे -प्राचार्य डॉ. सुजित टेटे
◾️ब्लॉसम स्कुलच्या तर्फे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न
देवरी 11: तालुक्यातील अग्रगण्य आणि लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी तर्फे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील लोकप्रिय हॉटेल सुख सागर येथील हॉल मध्ये करण्यात आले होते.
सदर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल , शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे , शिक्षक नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , नामदेव अंबादे , हर्षदा चारमोडे आणि राहुल मोहुर्ले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारावा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम आणि आत्मविश्वासच्या बळावर जीवनाला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडावी असे मत प्रा. डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्विकारत नृत्य आणि खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिता उंदीरवाडे, निसर्ग मूलकलवार, विभांशु गायधने , मोक्ष साखरे , गुंजन रोकडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकत्रित अल्पोपहारानी झाली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन हॉटेल सुख सागर चे संचालक जुगनू भाटिया यांनी केल असून यशासाठी विद्यार्थांनी मोलाचे सहकार्य केले.